जळगाव | उन्हाळा आता तापमानाच्या (Temperature) वाढीसह सर्वांना जाणवायला लागला आहे. दिवसेंदिवस राज्यात तापमानात वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना बाहेर देखील पडता येत नाही.
तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकंना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अशातच एक वाईट बातमी समोर येत आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
राज्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. जळगावमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
अमळनेर तालुक्यातील मांडळ भागात उन्हाचा जोर वाढला आहे. 33 वर्षीय जितेंद्र संजय माळी हे आपल्या शेतातून घरी परतत असताना त्यांचा मृत्यू झाला.
अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. उष्माघातासारखी लक्षणं असल्यानं मृत्यू झाल्याचं स्थानिक डाॅक्टरांचं म्हणणं आहे.
मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची माहिती स्थानिक रूग्णालयातील डाॅक्टरांनी दिली आहे. त्यानंतर आता पुढील रिपोर्टनूसार माहिती मिळणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जळगाव भागात तापमानाचा पार चढलेला आहे. 44 अंशाच्या वर तापमान पहायला मिळत आहे. परिणामी काळजी घेण्याचं आवाहन डाॅक्टरांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”
“भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”
1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय