मुंबई | देशात मोठ्या उत्साहात सर्वत्र होळी साजरी केली जाते. होळीच्या पुर्वसंध्येला घरात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्वजण प्रार्थना देखील करत आहेत.
सर्वांना आपल्या आयुष्यात एक निश्चित कमाईची अपेक्षा असते. आपल्याकडील असलेला पैसा हा योग्य ठिकाणी गुंतवून नफा कमावण्याचा उद्देश सर्वांचा असतो.
होळीच्या दिवसात शेअर बाजारात (Stock Market) देखील बऱ्याच प्रमाणात चढ-उतार पहायला मिळतात. परिणामी अनेकांना प्रचंड नफा कमवून देणारे शेअर माहिती करून घेण्याची ईच्छा असते.
देशासह जगातील विश्वसनीय कंपनी म्हणून टाटा मोटर्सला ओळखण्यात येतं. टाटा मोटर्सच्या शेअर्सधारकांना गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता तज्ज्ञांनी काही शेअर्सविषयी माहिती दिली आहे.
होळीच्या दिवसात जर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर येणाऱ्या काळात मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. सध्या टाटा मोटर्सचा शेअर 432.75 रूपयांना आहे.
विपुल ऑरगॅनिक लिमीटेडचा शेअर येत्या काळात नव्या उंचीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांना मोठा फायदा हा स्टाॅक करून देऊ शकतो. सध्या 214.85 रूपयांवर शेअर आहे.
रिलायंस इंडस्ट्रीजचा शेअर हा भारतीय बाजारीत एक आग्रगण्य शेअर मानला जातो. सध्या 2440.30 रूपयांवर रिलायंसचा शेअर आहे.
आयसीआयसीआय बॅंकेचा शेअर देखील मोठा नफा देऊ शकतो. 720.55 रूपयांवर सध्या आयसीआयसीआयचा शेअर आहे. डीएलएफ कंपनीचा शेअर देखील गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाचा आहे. सध्या 362.30 रूपयांवर डीएलएफचा शेअर आहे.
दरम्यान, शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अनेकांनी पैसे देखील गमावले आहेत. त्यामुळे कोणताही शेअर घेण्याआधी योग्य माहिती घेऊन शेअर स्वत:च्या जोखमेवर शेअर घ्यावा, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा
अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल
बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल!
“‘द कश्मीर फाइल्स’चं काय, ‘ठाकरे’ सिनेमाही आम्ही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नव्हता”