मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नव्या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासहित सात राज्यांत डेल्टाक्रॉनच्या संसर्गानं बाधित रुग्णांच्या शक्यतेनं आरोग्य विभागाच्या गोटात धडकी भरवली आहे.
कोविड संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरियंटन पुन्हा डोक वर काढलं आहे. ‘डेल्टाक्रॉन’ विषाणूची लक्षणे पूर्वीच्या विषाणूपेक्षा भिन्न आढळून आली होती.
डेल्टाक्रॉन संसर्गित रुग्णाला सौम्य तसेच गंभीर स्वरुपातील लक्षणे देखील जाणवू शकतात. तीव्र डोकेदुखी, घाम येणे, अशक्तपणा, दम लागणे, घशात खवखव, हद्याचे ठोके वाढणे आदी लक्षणे जाणवू शकतात.
चक्कर येणे तसेच थकवा ही लक्षणे दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. डेल्टाक्रॉनमुळे पोटाच्या प्रकृतीवर देखील परिणाम जाणवतो आहे. पोटदुख, पोटात जळजळ आदी लक्षणे डेल्टाक्रॉन बाधित रुग्णांत दिसून येत असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे.
आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात भारतात कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट जूनपासून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असेल. ही लाट जवळपास चार महिने राहू शकते, असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. आयआटी कानपूरमधील संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेलवर हा अंदाज जारी करण्यात आला आहे.
आयआयटी कानापूरमधील गणित आणि सांख्यिकी विभागाचे साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्र शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही”
अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना!
आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला
“एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”
The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई