लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर काही वेगळं दिसलं की त्याची तुफान चर्चा होते. अशातच जर कोणता तरी विचित्र व्हिडीओ समोर आला की तो व्हायरल होतो.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लाईव्ह मॅच सुरू असताना प्रेक्षकांच्या बसण्यासाठी व्यवस्था केलेली गॅलरी ढासळी असल्याचं दिसत आहे.

गॅलरी ढासळतानाची संपूर्ण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

उत्तर केरळमधल्या मलप्पूरम जिल्ह्यातील वंदूर येथे ही घटना घडली आहे. गॅलरी ढासळल्यावर सगळे लोक सैरभैर पळत असल्याचं पहायला मिळत आहे.

या भीषण घटनेत 200 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. 5 जणांची प्रकृती गंभीर त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. मोठ्या प्रमाणाावर या व्हिडीओवर प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “फक्त म्हणायला ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेतं पवार सरकार”

  बायकोनं मटन बनवलं नाही म्हणून नवऱ्याने फिरवला फोन, पोलीस घरी आले अन् घडलं भलतच!

धक्कादायक! मॅच सुरू असताना अचानक कोसळली गॅलरी; 200 हून अधिक जखमी; पाहा व्हिडीओ

“धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा चित्रपट निघाला तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तेलंगणात मोठा राडा; कलम 144 लागू