दोन कॅच सोडल्याने सामना गमवावा लागला; आता कोहलीला दंडही भरावा लागणार!

नवी दिल्ली | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाबचा आयपीएल सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांच्या काही चुकांमुळे त्यांनी हा सामना गमावला.

आरसीबीने हा सामना गमावलाच पण कर्णधार विराट कोहलीवर दंडही बसला आहे. किंग्ज इलेवन पंजाब सामान्याविरुद्ध आरसीबीने कमी वेगाने ओव्हर टाकल्याने १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात आरसीबी ९७ धावांनी हा सामना हरले. कर्णधार विराट कोहली किंग्ज इलेवन पंजाब सामान्याविरुद्ध कोणत्याच विभागात योगदान देऊ शकला नाही.

आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या सामन्यात खूपच हळू ओव्हर टाकली, तर ती आचारसंहिता मानली जाते. आयपीएलच्या या पहिल्याच मोसमात आरसीबीने उल्लंघन केले, त्यामुळे कोहलीला १२ लाखांचा दंड भरावा लागेल.

हा आयपीएलचा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला. विराट कोहली हा सामना विसरून जाण्याचा प्रयत्न करत असेल. कारण त्यांनी केएल राहुलचे दोन कॅच सोडले, जे त्यांना खूपच महागात पडले.

त्याचबरोबर विराट कोहली फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्यातही त्याने केवळ एक धाव काढून खाते उघडले. त्यातच किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या.

आयपीएल मोसमात भारतीय फलंदाजाने एका सामन्यात केलेल्या या सर्वात जास्त धावा आहे. विराट कोहलीने १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर त्याचा कॅच सोडून दिला होता. के. एल. राहुलचा त्याने हा सोडलेला एकच कॅच नव्हता.

१८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही विराट कोहलीने आणखी एकदा के.एल. राहुलचा कॅच सोडून त्याला जीवदान दिलं. विराट कोहलीने राहुलचे दोन कॅच सोडले त्यावेळी तो अनुक्रमे ८३ आणि ८९ धावांवर होता. त्यानंतर राहुलने धमाकेदार शतक ठोकले आणि बंगळुरुला याची मोठी किंमत मोजावी लागली.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?

पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल!

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घडला असा प्रकार; साऱ्या पुण्यात उडाली खळबळ

आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीनं आणली ही जबरदस्त ऑफर

सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं असं काही; आजारी चाहत्याला बसला सुखद धक्का!