आईचा जीव वाचवण्यासाठी मुलीने दिला तोंडावाटे श्वास, व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे भरून येतील

लखनऊ |  गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग खूप जदल गतीने होत असल्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असल्याचं दिसून येतं आहे. तसेच कोरोना विषाणू हा डायरेक्ट रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करत आहे. त्यामुळे रूग्णांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

अशात काही रूग्णांना श्वास घेण्यात त्रास होता. त्यामुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. परंतू अशा रूग्णांना ऑक्सिजनच्या आभावे ऑक्सिजन नसल्यामुळे त्यांच्यावर डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. अशातच याच संबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी तिला तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या आईचा जीव वाचावा यासाठी त्या मुलीची सुरू असलेली तडफड व्हिडीओमध्ये साफ दिसून येत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ ‘@Join_AmitSingh’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘इन दिनों पूरा देश ऑक्सीजन की कमी से जूझ रहा है।ऑक्सीजन की कमी से मरने वालों की खबरें लगातार सामने आ रही हैं। बहराइच के एक अस्पताल में कोरोना संक्रमित महिला को जब ऑक्सीजन नहीं मिली तो लाचार बेटी ने मुंह से सांस देने का प्रयास किया। ये वीडियो काफ़ी वायरल हो रहा।’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच ही व्हिडीओपाहून अनेकांचे डोळे भरून येत आहेत. या व्हिडीओला अनेक कमेंट येत असून, आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 700 लोकांनी पाहिला आहे.


महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! कोविड वॉर्डमध्ये असलेल्या नर्सने असं काही केलं…

‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल…

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू…

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…

…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy