लव, सेक्स और धोखा: PUBG खेळताना तरूणीशी झाली मैत्री अन्…

पटना | पब्जी या ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवरील खेळानं जगभर धुमाकुळ घातला होता. सर्वकाही विसरून पब्जी खेळणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपण पाहिल्या असतील.

पब्जीचं वेड इतकं वाढलं की स्वत: वरील ताबा सुटायला लागला होता. परिणामी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना पब्जीचं व्यसन लागलं होतं.

पब्जी खेळण्यात गुंतलेल्यांनी अनेक प्रकारचे गुन्हे देखील केले आहेत. पब्जी हा खेळ एका विकृतीची मालिका तयार करत होता. त्यामुळे अनेकजण या ऑनलाईन गेमच्या आहारी गेले होते.

पब्जीच्या कारणानं अनेकांची ऑनलाईन मैत्री देखील झाली. मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं आणि कधी शारिरीक संबंधास सुरूवात झाली हे अनेकांना कळालं नाही. अशात सध्या एक प्रकरण प्रचंड गाजत आहे.

पटना भागातील फुलवारी शरीफमध्ये एका मुलीनं आपल्यावर बलात्कार आणि मानसिक ताण दिल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी रितीक राज नावाच्या तरूणाला अटक केली आहे.

रितीक राज आणि संबंधित तरूणीची ओळख पब्जी खेळताना झाली होती. पब्जी खेळताना झालेल्या ओळखीनंतर रितीकनं तरूणीला भेटायला बोलावून शारिरीक संबंध ठेवले आणि आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले होते, असं तक्रारदार तरूणीनं सांगितलं आहे.

रितीक राज युवतीला व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी द्यायचा. रितीकनं युवतीवर 4 वर्ष अत्याचार केला आहे. तिच्या नावानं तो हाॅटेल बूक करायचा अन् शारिरीक संबंध ठेवायचा, असंही युवतीनं पोलिसांना सांगितलं आहे.

तक्रारदार युवतीचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट रितीकनं हॅक केले होते. परिणामी तिला तो त्रास देत होता. अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याच्या विचारात असणाऱ्या युवतीनं धाडस करून आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं