दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी घेण्यात येणारी परीक्षा देशातील अतिशय कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी देशातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, रात्रंदिवस अभ्यास करत काही मोजकेच जण या परीक्षेत यशाच्या शिखरावर पोहचतात. अतिशय कठोर परस्थितीत अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात युपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या उम्मूल खेर यांच्या यशामागील संघर्षाची कथा आज आपण जाणून घेवूयात.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे उम्मूल आपल्या कुटुंबासह झोपडपट्टीत राहत होत्या. उम्मुलचे वडील रस्त्यावर काही वस्तू विकून कुटुंबाच्या पोटाची खळगी भरत होते. मात्र, उम्मूल राहत असणाऱ्या झोपडपट्ट्या हटवल्या गेल्या यामुळे उम्मूल यांच्या कुटुंबाला त्रिलोकपुरी येथे भाड्याच्या घरात राहावे लागले. यावेळी उम्मूल यांच्या वडीलांच्या हातचे कामही सुटले होते.
या कठीण काळात घर चालवण्यासाठी उम्मूल स्वतः मुलांच्या ट्युशन घेऊ लागल्या होत्या. उम्मूल ज्या मुलांची ट्युशन घेत होत्या त्या मुलांचीही आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यामुळे त्या मुलांकडून फक्त 50 रुपये फी घेत होत्या. यावेळच्या परस्थितीविषयी बोलताना उम्मूल म्हणाल्या होत्या की, ‘तो काळ अडचणींनी भरलेला होता. शिकवणी, भाडे आणि घरखर्च यामुळे माझा अभ्यास सुरु ठेवणं कठीण होतं.’
उम्मूल लहानपणीपासूनच आपल्या अभ्यासाविषयी खूप गंभीर होत्या. त्यांनी दुसरीमध्येच आयएएस व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र उम्मूल यांच्या घरामध्ये शिक्षणाचं वातावरण नव्हतं. यामुळे उम्मूल यांच्या कुटुंबियांनी त्यांना आठवीनंतर शिक्षण थांबवून शिवनक्लास करण्यास सांगितलं होतं. मात्र, उम्मूल यांना शिक्षणाची इच्छा शांत बसू देत नव्हती. आठवीच्या पुढील शिक्षण उम्मूल यांनी स्वतः कष्ट करून पूर्ण केलं.
तसेच उम्मूल यांना लहानपणापासून नाजूक हाडांची समस्या होती. अगदी लहान वयात उम्मूल यांच्या 15 फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. उम्मूल शाळेत असतानाच उम्मूल यांच्या आईचा मृ.त्यू झाला होता. उम्मूल यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. मात्र उम्मूल यांच्या सावत्र आईला उम्मूल यांच अभ्यास कारण आवडत नव्हतं. त्यामुळे उम्मूल घर सोडून गेल्या आणि त्रिलोकपुरी येथील झोपडपट्टीत राहू लागल्या.
घर सोडल्यानंतर उम्मूल यांनी चार बॅचमध्ये मुलांच्या ट्युशन घेत आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मास्टर्सच्या शिक्षणासाठी जेएनयुमध्ये प्रवेश घेतला. त्याबरोबरच आपला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरु ठेवला. 2017 मध्ये उम्मूल यांनी युपीएससी परीक्षा पहिल्या प्रयत्नात क्रॅक केली आणि देशातून 420 नंबरची रँक मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; दिशाच्या शेजाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा
करण जोहरच्या ‘त्या’ व्हिडीओनं केला धक्कादायक खुलासा! अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाचं खुलं आवाहन, आदित्य ठाकरेंवरही केले गंभीर आरोप म्हणाली…
“शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात; मग मराठा आरक्षण का दिलं नाही?”
बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक होणार? फडणवीसांनी दिल उत्तर म्हणाले…