Top news कोरोना

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे भावनिक पत्र, म्हणाली….

Photo Credit - santhosh babu / Twitter

कर्नाटक| मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशातच सोशल मीडियावर सध्या एका 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र व्हायरल होतं आहे. कर्नाटकमधील या मुलीने आईचा मोबाईल गायब झाल्याने हे भावुक पत्र लिहिले आहे.

त्या मुलीच्या आईचा 16 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर ती अनाथालयामध्ये राहत आहे. या मुलीनं पत्रात आपल्या आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची कळकळीची विनंती केली आहे. पोलिसांनीही देखील मुलीच्या पत्राची दखल घेतली आहे.

कोडागुच्या कुशनगरमधील रहिवासी असणाऱ्या हृतिकक्षाने स्थानिक उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड रुग्णालयाला हे पत्र लिहिले आहे.

“माझ्या वडीलांची आणि आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. माझ्या आईची तब्येत बिघडल्याने तिला माडिकेरी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझे वडील व मी घरी होतो आणि त्यावेळी बाहेर जाऊ शकलो नाही,”

“माझे वडील रोजंदारीवर कामाला आहेत आणि आम्ही शेजार्‍यांच्या मदत केल्यामुळे आता हा दिवस पाहू शकत आहे. माझ्या आईचे 16 मे रोजी निधन झाले. माझ्या आईचा मोबाईल फोन तिच्याबरोबर असणाऱ्या कोणीतरी घेतला आहे. मी आईला गमावल्याने मी अनाथ झाले. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या बर्‍याच आठवणी आहेत. मी विनंती करते की ज्यांनी फोन घेतला आहे किंवा ज्यांना सापडला असेल त्यांनी तो अनाथालयामध्ये परत आणून द्या,” अशी विनंती हृतिकक्षाने पत्रातून केली आहे.

हृतिक्षाचे वडील नवीन कुमार यांनी सांगितलं की, “माझी पत्नी टी के प्रभाने नुकताच अखेरचा श्वास घेतला. तिचं सामान आम्हाला मिळालं, मात्र तिचा मोबाईल सापडलेला नाही. आम्ही तिच्या नंबरवर बर्‍याच वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद आहे. आईचा मोबाईल न मिळाल्याने हृतिक्षाच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आहे. आमच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी त्या फोनमध्ये साठवलेल्या आहेत. आईच्या फोनवरुन हृतिक्षा ऑनलाईन शिक्षणही घेत होती. नवीन फोन खरेदी करणे मला शक्य नाही. तरी आम्हाला तिच्या आईचाच फोन परत हवा आहे.”

 

महत्वाच्या बातम्या – 

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘जीने मेरा दिल लुटया…’; चिमुकल्याचा…

चक्क कुत्राही करतोय विकेंडची तयारी, पाहा व्हिडीओ

आता हेच पाहायचं राहिलं होत; चक्क गाई खेळतीय फुटबॉल, पाहा…

‘सलमान खान माझे कपडे आणि चप्पल सांभाळायचा’,…