मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईलाचं पळवलं अन्…..

धुळे| लोक प्रेमात काय काय करतील याचा काही नेम नाही. अलिकडे एकतर्फी प्रेमातून अनेक धक्कादायक प्रकार घडल्यांचं समोर आले आहेत. रोज नवनवीन, विचित्र घडनांना सामोरं जावं लागत आहे. अशातच अजून धक्कादायक घटना समोर येत आहे.

एका तरूणाने मुलगी देत नाही म्हणून चक्क तिच्या आईलाच प.ळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे त्यांच्या परिवारातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मुलगी दिली नाही म्हणून चक्क मुलीच्या आईलाच पळवल्याचा अनोखा प्रकार धुळ्यात घडलेला समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी एक तरुण मुलीला पहायला तिच्या घरी स्थळ घेऊन गेला होता. त्या मुलाला मुलगी आवडली मात्र मुलीच्या घरच्यांनी या लग्नासाठी नकार दिला. हा नकार सहन न झाल्यानं त्या तरुणानं मुलीच्या घरच्यांना चाकू दाखवत धमकी दिली. या तरुणाने चाकूचा धाक दाखवत मुलीच्या आईलाच पळून नेईल अशी चक्क धमकी दिली. तरुणाची ही अजब पद्धत मुलीच्या घरच्यांना आवडली नाही. तरुणाचा हा प्रकार पाहून मुलीच्या घरच्यांनी लग्नास थेट नकार दिला.

त्यानंतर त्या तरुणानं मुलीच्या आईशी बोलणं हळूहळू चालू केलं. त्यांच्याशी जवळीतचा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक दिवस मुलीची आई घरातून गायब झाली. त्यांचा पती घरी आल्यावर मुलीची आई घरी नसल्याचं त्यांना कळलं. त्यांनी मुलीच्या आईला फोन केला. फोन लावल्यावर मुलीच्या आईने पुन्हा घरी येण्यास नकार दिला आणि आम्ही दोघं लग्न करणार असल्याचं तिच्या पतीला तिनं सांगितलं.

दरम्यान, पळून गेलेल्या मुलीच्या आईचं वय 41 वर्ष आहे. तर तिला 5 मुलामुलींसह 4 नातवंड देखील आहेत. तिच्या लग्नाला 25 वर्ष देखील पुर्ण झाली आहेत. मुलीच्या आईने केलेल्या प्रकारामुळे तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’; म्हणणाऱ्यांवर जयंत…

‘मला किस करशीर का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…

“न्यायव्यवस्थेचा प्रयत्न करुन सरकारवर दबाव आणण्याचा…

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत; वाढवलं तब्बल ‘इतकं’…

“मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतित…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy