Top news देश

पब्जी लव्हर्ससाठी मोठी बातमी! भारत सरकारने पब्जी विषयी घेतला महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | पब्जी या गेमने जगभरातील तरुणाईला वेड लावलं आहे. भारतातील कित्येक तरुण या गेमच्या आहारी गेले आहेत. काही तरुणांचं या गेममुळे मानसिक संतुलन बिघडल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांनी दाखवल्या होत्या. यानंतर भारत सरकारने गोपनीयतेचे कारण देत भारतातील तब्बल 118 अॅप्सवर बंदी घातली होती. या अॅप्समध्ये पब्जीचा देखील समावेश होता.

मात्र, यानंतर देखील पब्जी गेम चालूच होती. भारत सरकारने आता पुन्हा एकदा पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट या गेम्स भारतात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 30 ऑक्टोबर पासून या दोन्ही गेम्स भारतात काम करणे पूर्णपणे बंद करतील.

चीनकडून सुरक्षा धोक्यात येत असल्याचं सांगत भारत सरकारने 118 अप्सवर बंदी घातली होती. भारत सरकारच्या या निर्णयानंतर मोबाईल गेमची मालकी असलेल्या टेन्सेंट गेमला चांगलाच धक्का बसला आहे. यासंबंधीत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतात पब्जीवर आलेली बंदी ही अतिशय दुःखद गोष्ट असल्याचं टेन्सेंट गेम्सने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच टेन्सेंट गेमने या पोस्टमध्ये भारतात पब्जी मोबाईल आणि पब्जी लाईटला समर्थन दिल्याबद्दल फॅन्सचे आभार देखील मानले आहेत. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये इतरही काही माहिती दिली आहे.

युजर्सच्या डेटाची गोपनीयता राखणे याला नेहमीच आम्ही प्राथमिकता दिली आहे. आमच्या कंपनीने भारतात नेहमीच डेटा सुरक्षा कायदे आणि रेगुलेशन्सचे पालन केले आहे, असं टेन्सेंटने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच आमच्या प्रायव्हसी पॉलीसीत असं म्हटलं आहे की, सर्व युजर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रोसेस केली जाते. टेन्सेंट पब्जी मोबाईलचे डेव्हलपर पब्जी कार्पोरेशन सर्व अधिकार परत आहेत जी क्राफ्ट गेम युनियनची कंपनी आहे, असंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान,  कोव्हीड काळात लागू करण्यात आलेल्या लोककडाऊनमध्ये भारतात पब्जी गेम युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना पब्जीचं वेद लागलं होतं.

पब्जीवर भारतात आलेली बंदी हा पब्जी लव्हर्स आणि गेमर्ससाठी खूप मोठा धक्का होता. भारताने 118 अप्सवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या टेक कंपनीच्या मार्केट व्हल्यूमध्ये सुमारे 34 अरब डॉलरची घसरून झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी एनसीबीचा धक्कादायक खुलासा! सुशांतच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा संबंध असू शकतो

मुंबई इंडियन्सच्या टीमसह समर्थकांना मोठा झटका! मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये नाही?

प्रेक्षकांना भुरळ घालणारी रेखाची ‘ती’ भूमिका आता श्रद्धा साकारतेय; वाचा सविस्तर

विराट कोहलीने मैदानातून अनुष्काला विचारला ‘तो’ प्रश्न; प्रेक्षक झाले हैराण!

कंगना राणावतला अट.क होणार? न्यायालयाने कंगना विरुद्ध पोलिसांना दिले महत्वाचा आदेश