मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. उद्या आवाजी मतदानाच्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार होती.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक पार पडणार होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पत्रव्यवहार झाला होता.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. नियम बदलाची प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांनी पत्रात म्हटलं होतं.
राज्यपालांनी मंजूरी दिली नाही तर निवडणूक होणारच असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, अखेर राज्य सरकारने ही निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्यानंतर देखील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, ज्या नेत्यांच्या सल्ल्याने हे सरकार चाललं आहे. अशा रिमो़ट कंट्रोलने फोन केला आणि त्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राज्यपालाच्या संमतीशिवाय निवडणूक घेणे, ही घटनेचे उल्लंघन ठरेल. त्यातून राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते, असं सरकारच्या रिमोट कंट्रोलने सांगितलं होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
त्यांना खुर्ची एवढी प्यारी आहे की, त्यामुळे अखेर निवडणूकच पुढे ढकलावी लागली, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
सरकारमधून बाहेर पडण्याची चढाओढ सुरू आहे. सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता कोण स्थापन करणार, याची स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच गेल्या दोन दिवसातील घडामोडी घडल्या आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची इच्छा शिवसेना आणि राष्ट्रवादीला नव्हती. दम होता तर निवडणूक का घेतली नाही?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या –
भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”
नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-
मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई