मुंबई | ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आज या जगाचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अद्याप देखील त्याच्या चाहत्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही.
सिद्धार्थची सर्वात जवळची मैत्रिण असणाऱ्या शहनाज गीलसाठी हा खूप मोठा धक्का आहे. तिची प्रकृती सध्या कशी आहे, याबद्दल सर्वजण चिंतेत आहेत. अशातच आता शहनाजच्या प्रकृतीबद्दल तिचे वडिल संतोष सिंह सुख यांनी माहिती दिली आहे.
शहनाजच्या वडिलांनी सांगितले की, मी शहनाजशी संवाद साधला तिची प्रकृती ठिक नाही. ती पूर्णपणे तुटली आहे. शहनाजला संभाळण्यासाठी तिचा भाऊ मुंबईला रवाना झाला आहे. तिच्या भावानंतर आता मी देखील तिच्यापाशी मुंबईला जाईल.
सिद्धार्थ आता या जगात नाही, या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. ही गोष्ट पचवणे माझ्यासाठी खूप कठिण आहे. मी आता जास्त काही बोलण्याच्या परिस्थितीत नाही, असं देखील यावेळी शहनाजचे वडिल यावेळी म्हणाले.
दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.
या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.
तसेच डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
कोणासोबत एक रात्र घालवशील? भूमी पेडणेकर म्हणते…
‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन
स्वत:च्याच लग्नात नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ
‘धूम मचाले’ म्हणत तरूण आपल्या गाडीसह थेट शिरला घरात, पाहा मजेशीर व्हिडीओ
काय सांगता! चक्क हवेत उडतोय पिझ्झा, विश्वास नसेल बसत तर पाहा व्हायरल व्हिडीओ