मुंबई | बॉलीवूड इंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांचे प्रेमसंबंध सतत जुळतात आणि तुटतात देखील. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
अशीच काहीशी चर्चा काही वर्षांपूर्वी अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहीद कपूर यांच्या प्रेमसंबंधांची होती. या दोघांच्या जोडीने काही वर्षांपूर्वी सर्वांच्याच मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. काही वर्षांपूर्वी प्रत्येकाच्याच तोंडी फक्त या दोघांचंच नाव होतं.
मात्र, रिअल लाईफ मधील या जोडीचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. काही कारणास्तव या दोघांचं नंतर ब्रेकअप झालं आणि दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात पुढे गेले. मात्र, प्रेमसंबंधातील आठवणी नेहमीच मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात तशाच घर करून राहत असतात. अशातच सोशल मीडियावर या जोडीची चर्चा आता पुन्हा एकदा रंगली आहे.
करीनानं नुकतंच तिचा आणि शाहीदचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘जब वी मेट’ या चित्रपटातील हा फोटो आहे.
‘जब वी मेट’ या चित्रपटात शाहीद कपूर आणि करीना कपूर या दोघांनी एकत्र काम केलं होतं. 2007 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज या चित्रपटाला तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.
याच चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना करीनानं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीना कपूर, शाहीद कपूर आणी इम्तियाज अली हे तिघेजण दिसत आहेत. जब वी मेट चित्रपटातील करीना आणि शाहीदच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं.
करीनानं या फोटोसोबत सुंदर कॅप्शन देखील दिला आहे. जिवनात जी गोष्ट माणसाला खरंच हवी असते, ती गोष्ट माणसाला नक्कीच मिळत असते, असं कॅप्शन करीनानं या फोटोसोबत दिलं आहे. करीनानं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेक लोक ‘जब वी मेट’चा दुसरा पार्ट पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का? भाजप कार्यालयातील ‘त्या’ घटनेनं अनेकजन गोंधळात!
धक्कादायक! मुंबईत ‘या’ बड्या अभिनेत्रीवर चाकूने ह.ल्ला
शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अन् शेवट भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या ‘या’ माजी आमदाराचं नि.धन
पुण्यातील लाॅजवर पोलिसांनी टाकला छापा, आत सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही हैराण!
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याला उतरती कळा, विचार करणार नाही इतकं स्वस्त!