Top news देश

काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला

temp e1647252048636
Photo Credit - Pixabay

मुंबई |  सध्या सर्वत्र सुर्य आग ओकत असल्यासारखं दिसत आहे. ऐन दिवसा देखील उन्हाचे चटके बसत असल्यानं नागरिक घराबाहेर पडत नाहीत.

हवामान खात्याकडून वेळोवेळी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. असं असलं तरी राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळं दोघांचा मृत्यू झाला आहे.

मार्चमधील तापमानानं गेल्या अनेक वर्षातील मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडला आहे. मार्च 2022 हा तब्बल 122 वर्षांतील सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला आहे.

मार्च 2022 ची मासिक तापमान सरासरी 33.1 डिग्री सेल्सियस आहे. ज्याने मागील 33.09 सेल्सियसचा विक्रम मोडला आहे. परिणाम यावरून तापमानाचा अंदाज लावता येतो.

दिर्घकाळात असलेल्या उष्ण हवामानामुळे उष्ण हवामान निर्माण झाले आहे. अशा परिस्थीत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दिल्ली भागात तापमान उच्चांकावर गेलं आहे. तर काही भागात तापमानानं 41 अंश सेल्सियसची पातळी ओलांडली आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

3 एप्रिल ते 6 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सध्या वाढती उष्णता पाहाता हा अंदाज खरा ठरणार आहे.

दरम्यान, देशातील तापमान देखील यावर्षी इतर कोणत्याही परिस्थितीपेक्षा अधिक असणार आहे. अशात नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Ramdas Athawale: “…तोपर्यंत सरकार पडणार नाही”, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”