Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

धक्कादायक! ‘त्या’ आत्मह.त्या प्रकरणावरून फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत गृहमंत्री म्हणाले…

मुंबई | अन्वय नाईक आ.त्मह.त्या प्रकरणामुळे राज्यात चांगलाच गदारोळ उडाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी याना तु.रुंगात टाकलं होतं. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर चांगलीच फटकेबाजी चालू केली होती.

अशातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावरून तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एका वृत्त माध्यमाशी बोलताना देशमुख यांनी हे आरोप केले आहेत.

मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं होतं. सर्व नियम बाजूला ठेवून तत्कालीन फडणवीस सरकारकडून हे प्रकरण दाबण्यात आलं होतं,  असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

पुढे अनिल देशमुख म्हणाले की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मला पैसे न दिल्याने मी आ.त्मह.त्या करत आहे, अशी सु.साईड नोट अन्वय नाईक यांनी लिहिली होती.  या आ.त्म्ह.त्येनंतर हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयात एक मीटिंग घेण्यात आली होती.

तसेच अर्णव गोस्वामी यांना वाचवण्यासाठी नाईक आ.त्मह.त्या प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं होतं. नाईक यांच्या कुटुंबाने याप्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी आम्हाला केली होती. त्यानुसार आम्ही कारवाई सुरु केली आहे, असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णव गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते.

मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णव गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते. यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली.

नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. यामुळे नाईक कुटुंबियांवर मोठं दुःख ओढवलं होतं. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करत दुसरी इनिंग खेळणार?

धर्म परिवर्तनासाठी माझ्यावर दबाव टाकला; ‘या’ प्रसिद्ध सेलेब्रिटीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप!

‘कॉंग्रेस नेत्यासोबत वाद झाल्यानं पवार संतापून बैठकीतून निघून गेले अन्…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

‘निक रात्री मला झोपू देत नाही अन् रात्री उठून माझ्यासोबत…’; प्रियांका चोप्राचा पतीविषयी मोठा खुलासा!

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पुनावाला यांची कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा!