मुंबई | आजच्या गुडीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. आजच्या या भाषणात राज ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर विशेष भर दिला.
प्रार्थनेला माझा विरोध नाही. मशिदीवर लागलेले भोंगे खाली उतरावावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय नाही घेतला तर मशिदीसमोर हनुमान चालीसाचे दुप्पट स्पीकर लावा, असा थेट आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे.
मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, सर्वांनी आपला धर्म घरी ठेवावा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचं आता भाजपने देखील कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Raj Thackeray: “साला आमदारांना कसली घर विकताय?”, राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray: राज ठाकरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले…
शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं
काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला
‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा