सांगोला | 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा, असं म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अडवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या हॉटेल मालकाने आज दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.
हाॅटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला. खोत यांच्या आज पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार समोर आला आहे.
निवडणुकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदर मोड करून उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत आहे.
सदाभाऊ खोत गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी शिनगारे यांची समजूत काढली. समजूत काढून सदाभाऊंनी हॉटेलमालकाच्या तावडीतून सुटका करून घेतली.
दरम्यान, मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”
देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले…
राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी
सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी
“20 जूनला देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार करणार”