लातूर | शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape ) केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर (latur) जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे.
दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील मदत मिळाली नाही.
अखेर पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनंतर पतीसह तिघांविरुद्ध औसा पोलिसांत बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रहिवासी असलेली एक 32 वर्षीय महिला पतीसह औसा तालुक्यातील सारोळा रोडवर असलेल्या एका पानमळ्यात सालगडी म्हणून वास्तव्यास होते.
काही दिवसांपूर्वी या पती-पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे ही महिला लातुरातील आपल्या आईकडे वास्तव्यास होती.
घटनेनंतर पीडित महिला घटनास्थळावरुन मध्यरात्री बाभळगाव नाक्यावर असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्यात विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले. परंतू, त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे जाण्याचा सल्ला दिला.
सदर महिला आईला सोबत घेवून पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. स्वतःवरील अत्याचाराची कर्मकहाणी ऐकवल्यानंतर त्यांनी औसा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल
लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती!
कोल्हापूरच्या निकालावरून शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले…
IPL 2022: दिल्लीचा 16 धावांनी पराभव करत बंगळुरूचा ‘राॅयल’ विजय; DKची वादळी खेळी
“रशिया-युक्रेनमुळे महागाई वाढली, मोदींनी तर…”, शेलारांचं वक्तव्य चर्चेत