‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

नवी दिल्ली | महाराष्ट्रात (Maharashtra Coronavirus Case)कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढता चालला आहे. कोरोना व्हायरस आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतोय. वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. अशात who च्या प्रमुखांनी दिलेल्या माहिती सर्वांचं टेंशन वाढलंय.

ओमिक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी आधीच आपल्या मर्यादा ओलांडत काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मला ओमिक्रॉनसंबंधी फार चिंता आहे, हा फार संसर्गजन्य आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सांगितलं आहे. आधीच थकलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर यामुळे खूप तणाव येणार असून आरोग्य यंत्रणा कोसळण्याची भीती आहे, असंही टेड्रोस म्हणाले. फक्त नव्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नसून अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे हेदेखील एक कारण आहे.

डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे, असंही WHO ने सांगितलंय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या आणि ओमायक्रॉन बाधितांच्या (Omicron cases in Maharashtra) संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ (Covid cases increasing in Mumbai) होत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

राज्यात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 167 इतकी झाली आहे. त्यापैकी 91 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ओमायक्रॉन बाधितांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाहीये. रुग्ण वाढत असल्याने तो निश्चितच काळजीचा विषय आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर 

“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट 

“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत 

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, “महात्मा गांधींच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी…”