“काश्मीरची मोहीम फत्ते केली, आत्ता आमचा पुढचा अजेंडा…”

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवणं हे सर्वात मोठं यश आहे. याशिवाय पीओकेला भारताचा अभिन्न भाग बनवणं हा आमचा पुढचा अजेंडा आहे, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. 

ही फक्त माझी किंवा माझ्या पक्षाची इच्छा नाही तर 1994 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वात असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारची देखील हीच इच्छा होती, असं जितेंद्र सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलताना म्हटलं आहे.

काही देश जे भारताच्या या निर्णयाच्या विरोधात होते ते आता भारताच्या बाजुने आहेत. काश्मीरमधील जनता देखील खूश आहे. काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे, असं म्हणतं सिंह यांनी कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या टिका आणि कुरापती यावर उत्तर दिलं आहे.

काश्मीरमध्ये लोकांवर बंदी नाही आणि कर्फ्यू देखील नाही. फक्त काही गोष्टींवर बंदी आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांनी आपली मानसिकता आता बदलली पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, दहशतवाद्यांकडून सामान्यांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तान वारंवार दहशतवाद जोपासायचं काम करतं, असंही जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –