‘द काश्मीर फाईल्स’ वरून प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

नवी दिल्ली | ‘द काश्मीर फाईल्स’ (the kashmir files) या सिनेमावरून सुरू असलेला वादाचा धुरळा अजूनही बसलेला नाही. अशात ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

आपल्या ट्वीटरवर प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गोध्रा हत्याकांड, दिल्ली दंगल, जीएसटी लागू केल्यावेळची आंदोलनं, नोटबंदीच्या वेळची परिस्थिती, कोविडच्या सुरुवातीच्या काळात मजुरांचं होणारं स्थलांतर, गंगेचं प्रदुषण या सगळ्याच्या फोटोंचं कोलाज केलेलं आहे.

या ट्विटमध्ये प्रकाश राज म्हणतात, निर्माते झालेले प्रिय सर्वोच्च अभिनेते, तुम्ही या फाईल्सकडेही लक्ष द्याल का आणि तेही प्रदर्शित कराल का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

प्रकाश राज हे देशातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर सातत्याने भाष्य करत असतात. आपले विचार आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात.

त्यांचं हे ट्विट द कश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरील आहे एवढं तर निश्चित! मात्र त्यांनी ट्विटमध्ये कोणाला टोला लगावला आहे हे मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेणार

“ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली”

‘…तोपर्यंत आई-वडीलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क नाही’; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांचा गंभीर इशारा 

“भाजपचेच 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच”