मुंबई | द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. 1990 मध्ये कश्मीरी पंडितांच्या झालेली हत्येच्या कथेवर आधारित असलेला हा चित्रपट सध्या देशभरात प्रदर्शित झाला आहे.
अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात उत्तम अभिनय केला. अभिनेते अनुपम खेर यांनी पुष्कर नाथ पंडित या नावाचं पात्र साकारलं. अनुपम खेर या चित्रपटात एका कश्मीरमध्ये राहणाऱ्या रिटायर्ड शिक्षकाची भूमिका साकारली.
पुष्कर नाथ पंडित यांचा नातू कृष्णा चित्रपटाच्या शेवटी सांगतो की, त्याच्या आजोबांना म्हणजेच पुष्करनाथ पंडित यांना डिमेंशिया आजार झाला होता.
डिमेंशिया हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे, ज्याबद्दल जगातील अनेक लोक तक्रार करत आहेत. डिमेंशिया या आजाराला स्मृतिभ्रंश देखील म्हणतात.
स्मृतिभ्रंश हा व्यक्तीच्या मेंदूच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. काही लोक डिमेंशियाला वेडेपणा म्हणतात, पण ते खरं नाही. डिमेंशिया हा यापैकी वेगळा मानसिक विकार आहे.
त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत रहाणं, बोलण्यात अडखळणं, जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतात, आजूबाजूला कोणी नसताना स्वतःशी बोलणं, अशी अनेक लक्षणं यामध्ये पहायला मिळतात.
डिमेंशिया हा काही मानसिक विकारांचा पुढचा टप्पा आहे. त्या मानसिक विकार जसे अल्झायमर, नैराश्य, तणाव इत्यादींची आधीच काळजी घेतली असेल आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“फडणवीस साहेब आपण काय डिटेक्टीव्ह एजेंन्सी काढली आहे का?”
…अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय
‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण