मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जमा झाले आहेत. नवाब मलिक, अजित पवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ हे नेते शरद पवारांसोबत असणार आहेत.
शरद पवार बाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून त्यांनी घराबाहेर पडू नये, पोलीस विनंती करणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था संयुक्त एसपी शरद पवार यांची भेट घेणार, त्यांच्या घरी येऊन भेट घेणार आहेत. तसेच पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत ईडी कार्यालयाबाहेर कलम 144 ( जमावबंदी ) लागू केले आहे.
शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे. शरद पवार आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत पवार ठरवू शकत नाहीत. चौकशीला बोलावल्यानंतरच पवारांना यावं लागेल, अशी माहिती ईडीकडून समजली आहे.
दरम्यान, मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“कायदा सुव्यवस्था राखणं केवळ आमचं काम नाही” – https://t.co/bWYWqvFzpf @dhananjay_munde @PawarSpeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई- राहुल गांधी – https://t.co/DJPEIURLqr @RahulGandhi @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार- जितेंद्र आव्हाड- https://t.co/FyENceTtR9 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019