निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान- संभाजी भिडे

सांगली | महाराष्ट्रा राज्यात काहीना-काही हे सुरूच असते. राज्यातील विविध पक्षाचे नेते कोणत्याना-कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. तर अशातच आपल्या बेधडक वक्तव्यानी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे हे सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहेत.

संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा घसरली असल्याचं बोललं जात आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असल्याचं भिडेंनी म्हटलं आहे. संभाजी भिडे सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी हजर होते, त्यावेळी ते म्हणाले.

जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.

मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक असल्याचंही भिंडें बोलत होते. त्याचप्रमाणे कोरोना हा थोतांड असल्याचंही त्यांनी म्हटलं.

तसेच संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्याच एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण राज्यातील नागरिक त्यांच्या या बोलण्यामुळे संतापले असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या मुहूर्तावर करा सोनं खरेदी, वाचा सोन्याचा आजचा दर

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदलेल्या मेंढरासारखी झाली आहे”

पेट्रोल-डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला, झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

“…तर शिवसेनेचे 56 आमदार त्यावेळी तुमच्यासोबत दिसले असते”