पर्यटकांच्या गाडीवर थेट चढला चित्ता अन्…पाहा व्हिडीओ

केपटाऊन | आपल्याला माहित आहे की, लोकांच्या आवडी-नावडी या खूप वेगवेगळ्या असतात. काहींना वेगवेगळे पदार्थ खाण्याचा खूप शौक असतो. तर काहींना तेच पदार्थ आपल्या हातांनी बनवण्याचा.

तसेच अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असते. त्या ठिकाणची खासीयत काय आहे. हे जाणून घ्यायला काहींना आवडते. उन्हाळ्याचा सुट्टीत नाहीतर दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक लोक आपल्या कुटुंबियांना घेऊन कोणत्यातरी पर्यटन स्थळी जातात.

पर्यटन स्थळी गेल्यावर आपण त्या ठिकाणची आठवण म्हणून अनेक फोटो, व्हि़डीओज हे काढत असतो. हल्ली तर या सगळ्या गोष्टींचा चांगलाच ट्रेंड झाला असल्याचं पाहायला मिळतं आहे.
प्रत्येकजण आपण कुठे गेलो आहे. त्या ठिकाणी जाऊन काय खाल्ले आहे. या सगळ्याची माहिती, त्याचबरोबर त्या सगळ्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये चक्क पर्यटकांच्याच गाडीवर चित्ता चढला असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ जंगलातील असल्याचं समजतं आहे. आपल्यासमोर एखाद्या प्राण्याचं नावं काढलं तरी आपल्याला घाबरायला होत. आणि इथं तर चक्क चित्ताच समोर आला आहे.

एक महिला जीबमध्ये बसली असून, अचानक त्या ठिकाणी एक चित्ता येतो. हे त्या गाडीत बसलेल्या महिलेला समजते ती न घाबरता तशीच शांतपणे त्या गाडीमध्ये बसून राहते. तो चित्ता त्या गाडीवर चढून इकडं-तिकडं पाहत आहे.

तसेच ती महिला बसल्या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ देखील शूट करत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती महिला त्या चित्त्यालाही दाखवत असल्याचं दिसून येते आहे. तसेच ती महिला म्हणावी तेवढी त्या चित्त्याला पाहून घाबरली नसल्याचं पाहायला मिळतं आहे. तिच्या या वागण्यावर तिला प्राण्यांची सवय असल्याचं लक्षात येतं आहे.

त्याचप्रमाणे हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 11 हजार लोकांनी पाहिला असून, अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! दाढी करताना वस्तारा लागला तरूणाच्या गळ्याला अन्…, पाहा व्हिडीओ

काय सांगता! स्वत:च्याच लग्नात नवरी गेली झोपी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

आजी-नातीचा डान्सचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क तरूणाने दुचाकीलाच बनवलं चारचाकी, पाहा व्हिडीओ

“…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही”