बिबट्यानं मगरीला जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं, शेवटी…; ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल

पाण्यात असताना मगर कोणाचीही शिकार करु शकते हे आपल्याला तर माहितच आहे. मात्र याच मगरीची पाण्यात जाऊन एका बिबट्यानं शिकार केलेली पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मगरही पाण्यातील एका राजापेक्षा काही कमी नाही. मात्र याच पाण्यात उडी मारत एका बिबट्यानं मोठ्या मगरीची शिकार केली आहे. बिबट्याच्या ताकदीसमोर मगरीची ताकद कमी पडल्यानं तिचा निभाव लागला नाही.

बिबट्यानं केलेल्या मगरीच्या शिकारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये मगर नदीमध्ये शांत विहार करताना दिसत आहेत. तिकडेच दुसरीकडे बिबट्या आपली शिकार पाहताना दिसतोय.

 

बिबट्या उंचावरुन उडी मारत मगरीवर झडप घालतो. मगरीला आपल्या जबड्यात पकडत पाण्यातून बाहेर आणतो. एवढ्या मोठ्या मगरीला बिबट्या आपल्या ताकदीनिशी पकडून ठेवतो. त्यामुळे मगरीनं बचावासाठी प्रयत्न करुनही काही फायदा होत नाही. ती बिबट्याच्या मजबूत पकडीपासून सुटत नाही.

भारतीय वन सेवेत असणाऱ्या सुधा रामेन यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून ‘crocodile hunter’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या मनुका खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

याच महिन्यात लाँच होणार मारुतीची ही बेस्ट सेलिंग कार; केलेत हे महत्त्वाचे बदल!‘हा’ व्यवसाय सुरु करा, दरमहा 70 हजार कमवा; सरकारही करतंय मदत!

मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज… आता रात्री उशिरापर्यंत बसता येणार!

स्टेजवर नवरदेवानं उचललं धक्कादायक पाऊल, नवरीही झाली आऊट ॲाफ कंट्रोल, पाहा Video