कार समोर अचानक आला बिबट्या अन्…, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पक्षु-पक्षांचे, प्राण्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

अशातच बिबट्या अचानक गाडीच्या समोर आला असल्याची घटना जुन्नरमध्ये घडली असल्याचं समोर आलं आहे.  अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यामध्ये बिबट्याचेही व्हिडीओ असताता. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, बिबट्या हा शिकार करण्यात खूप तरबेज आहे. त्याच्या जवळ जायचे कोणताही प्राणी करत नाही. जवळ जायचे तर सोडाच साधा लांबून जरी बिबट्या दिसला तरी, प्राणी आपली वाट बदलतात.

इथं तर चक्क माणसांसोमोर बिबट्या आला आहे. त्याची तर चांगलीच घाबरी झाली असेल. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये बिबट्या अचानक एका गाडीसमोर आला असल्याचं दिसून येत आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे सुरूवातीला निटसं काही दिसतं नव्हतं. त्यामुळे गाडी चालकाने तो बिबट्या आहे की दुसरं आणखीन काही, याची खात्री करण्यासाठी गाडी त्याच्या दिशेने घ्यायला सुरूवात केली.

गाडीची लाईट त्या बिबट्यावर पडल्यानंतर तो बिबट्याच असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्या बिबट्याला माणसांची चाहूल लागल्यानंतर त्याने तिथून पळ काढला आणि तो झाडीमध्ये परत गेला. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ गाडीतील कोणी तरी काढला असल्याचं समजतं आहे.

तसेच हा व्हिडीओ न्यूज 18 लोकमत या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत खूप लोकांनी पाहीलंही आहे.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! ‘या’ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा…

‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’; आईशी…

लाईव्ह शो चालू असताना झाला बाॅम्बब्लास्ट; अंगावर काटा आणणारा…

कोरोनाची नवीन लक्षणं; अशी लक्षणं दिसल्यास लगेच डाॅक्टरकडे जा

…..म्हणून जिवंतपणीच महिलेने स्वतःवर करुन घेतले…