‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार लवकरच करतोय लग्न! ‘ती’ आहे तरी कोण?

मुंबई | आजवर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. यातील काही चित्रपटांच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे तर काही चित्रपटांच्या माध्यमातून प्रेमकथा उलघडण्यात आल्या आहेत.  या चित्रपटांतील कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात आणि कित्येक वर्षांनंतर देखील प्रेक्षकांना ते कलाकार आठवतात.

प्रेक्षकांच्या मनात घर करणारा एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजल यांचे अनेक चित्रपट हिट आहेत. यातील ‘कुछ कुछ होता है’ याही चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर एकेकाळी अधिराज गाजवलं आहे .

या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांनी काम केलं आहे. याच चित्रपटात छोट्या सरदाराची भूमिका करणारा तो मुलगा आठवतो का तुम्हाला? तो जो आकाशात पाहून चांदण्या मोजताना दिसतो.

तसेच जेव्हा काजलचे लग्न होणार असते तेव्हा तो छोटा सरदार फक्त एकच डायलॉग म्हणतो. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ त्याचा हा डायलॉग आणि तो आजही लोकांच्या लक्षात आहे.

छोट्या सरदाराची भुमिका साकरणाऱ्या  परझान दस्तूरने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली होती. मात्र, हाच परझान आता मोठा झाला असून लवकरच तो विवाह बंधनात अडकणार आहे.

तो फेब्रुवारी 2021 मध्ये त्याची मैत्रीण डेलना श्रॉफ हिच्याशी लग्नाच्या रेशीम गाठीत बंधणार आहे. याविषयीची माहिती परझान दस्तूरने स्वतः सोशल मिडीयावर दिली आहे.

त्याने सोशल मिडीयावर डेलनाला प्रपोज करतानाचा आपला एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने एका वर्षापुर्वी तिने होकार दिला होता आणि आता ४ महिन्यानंतर लग्न होईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, परझान दस्तूरने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. ‘हम तुम’ या चित्रपटाला परझाननं आपला आवाजही दिला होता. तसेच ‘सिकंदर’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने फुटबॉल प्लेयरची भूमिका केली होती. परझान सध्या स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस चालवतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या अभिनेत्रीने पुन्हा उद्धव ठाकरेंवर केले धक्कादायक आरोप म्हणाली…

करीनानं शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूरचा फोटो! नक्की कनेक्शन काय आहे?

खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का? भाजप कार्यालयातील ‘त्या’ घटनेनं अनेकजन गोंधळात!

धक्कादायक! मुंबईत ‘या’ बड्या अभिनेत्रीवर चाकूने ह.ल्ला

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अन् शेवट भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या ‘या’ माजी आमदाराचं नि.धन