दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबच्या फलंदाजांचे लोटांगण; 9 गडी राखत दणक्यात विजय

मुंबई | यंदाच्या हंगामातील आजचा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात पार पडला. दोन्ही संघात आज चांगली लढत होणार अशी शक्यता होता. मात्र, दिल्लीच्या फिरकीपटूंनी आज पंजाबच्या फलंदाजांना लोळवलं.

दिल्लीने आजचा सामना 9 गडी राखत जिंकला आहे. फक्त 10.2 षटकात दिल्लीने हा सामना जिंकला आहे. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबचा संघ 115 धावाच करु शकला आहे. त्यामुळे दिल्लीला जिंकण्यासाठी अवघ्या 116 धावांचे आव्हान होतं.

दिल्लीची सुरूवात दमदार झाली. पृथ्वी आणि वॉर्नरने 5 षटकात 75 धावा केल्या आहेत आणि दिल्लीचा विजय जवळजवळ निश्चित केला होता. 41 धावांची तुफान खेळी करुन पृथ्वी शॉ बाद झाला आहे. राहुल चाहरने त्याची विकेट घेतली आहे.

त्यानंतर मात्र डेव्हिड वाॅर्नरने 30 चेंडूत 60 धावा केल्या. तर सरफराजने एकही विकेट पडू न देता सामना खिश्यात घातला. त्यापूर्वी पंजाबच्या फलंदाजांची दाणादाण झाल्याचं पहायला मिळालं.

अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि ललीत यादव यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. अक्षर पटेल आणि कलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले तर ललीत यादव याने एक विकेट घेतली.

दरम्यान, 14 षटकानंतर पंजाबचा संघाची स्थिती 7 बाद 90 धावा अशी होती. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यानंतर पंजाबचा संघाला फक्त 115 धावा करता आल्या.

महत्वाच्या बातम्या- 

पिंपरी-चिंचवडचे डाॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली!

नवरा मध्यरात्री उठून असं काही करायचा की…; बायकोला तर धक्काच बसला

ऐकलं का??? देशाच्या अर्थमंत्री म्हणतात, “भारतात खूप काही महागाई नाही”

पाकिस्तानी खासदाराने सभागृहात कुर्ता वर करून केलं असं काही की…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Devon Conway च्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नईच्या खेळाडूंचा लुंगी डान्स; पाहा व्हिडीओ