स्पिनचा जादूगर हरपला! दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचं 52व्या वर्षी निधन

मुंबई | ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

केवळ 15 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जगातील दिग्गज फलंदाजांना घाम फोडायला लावणाऱ्या शेन वाॅर्नने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी खूप मोलाची कामगिरी केली.

2007 साली शेन वाॅर्नने क्रिकेटला अलविदा केला होता. शेन वाॅर्न जगातील दुसरा गोलंदाज होता, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 बळी मिळवण्याचा विक्रम केला आहे.

सचिन तेंडुलकर ज्यावेळी भारताकडून मैदान गाजवत असे त्यावेळी शेन वाॅर्न ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजांना मैदानात टिकू देत नव्हता.

सचिन तेंडूलकर माझ्या स्वप्नात येतो आणि माझ्या गोलंदाजीवर षटकार खेचतो, असं त्याने स्वत: जाहीरपणे सांगितलं होतं.

दरम्यान, त्यानंतर सचिन आणि शेन वाॅर्न चांगले मित्र होते. शेन वाॅर्नच्या जाण्याने आता जागतिक क्रिकेटला मोठा धक्काच बसलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीनं केलं ट्रॅफिक जॅम! भर रस्त्यात उभी केली बस अन्…; पाहा व्हिडीओ

“भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू” 

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर