“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ”

मुंबई | भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने व्यंगचित्रातून शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर टीव्ही दाखवण्यात आला असून त्यावर हिंदुत्वाचा खरा विचार ऐकण्यासाठी आलंच पाहिजे, अशी बातमी सुरु आहे.

तसेच दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर सांगत असून त्यावर ते होय साहेब असं उत्तर देत असताना दाखवलं आहे.

भाजपच्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यानी भाजपला सुनावलं आहे.

आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू. 2024 मध्ये महाविकास आघाडी परत एकदा निवडून येईल. भाजपचं सत्तेत येण्याचं स्वप्न पूर्णपणे भंग झालेलं आहे, असा टोलाही महेश तपासे यांनी भाजपला लगाला आहे.

महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्विकारलं. यामुळे महाराष्ट्र पुनश्च प्रगतीपथावर आलं आणि म्हणूनच भाजपच्या पोटात दुखत असल्याने वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत, असं महेश तपासे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

संभाजीराजेंनी उचललं मोठं पाऊल, पत्रकार परिषद घेत केली ‘ही’ घोषणा 

उत्तर कोरियात कोरोनाचे दोन रूग्ण आढळताच किम जोंगची मोठी घोषणा! 

 केवळ अफलातून! गणेश मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा प्रवास

सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा

 “घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई”; सोमय्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा