सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका, उद्या बहुमताची चाचणी होणार

नवी दिल्ली | राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिले. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे सुरू झालेलं हे सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. गेल्या तीन तासांपासून सुरू असलेली फ्लोअर टेस्ट विरोधातील सुनावणी अखेर पार पडली आहे.

बहुमत चाचणीवर स्टे लावता येणार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उद्या सकाळी 11 ते 5 यावेळेत बहुमत चाचणी होणार आहे.

तब्बल 3 तासांच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. शिवसेनेची याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील उद्या मुंबईत दाखल होतील. त्यामुळे उद्या सत्तापालट होणार का?, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी! बहुमत चाचणीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

‘बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, मुंबईत येताच…’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

“हारी बाजी को जितना जिसे आता है वो देवेंद्र कहलाता है”

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या बहुमत चाचणी होणार?