ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश

मुंबई | टी ट्वेंटी विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना आज खेळवण्यात आला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन तगड्या संघात हा सामना झाला आहे. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 6 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला आहे.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार एराॅन फिंचचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पोकळा ठरवला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात करून दिली.

कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. पाॅवर प्लेनंतर ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरने पाकिस्तानची रनगती काहीशी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 10 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला गडी बाद करता आला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 34 चेंडूत 39 धावा करत बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामन्यावर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फकर जमानने ऑस्ट्रेलियाचे मनसुबे पार करू दिले नाहीत.

एकीकडे मोहम्मद रिझवान एक बाजू सांभाळून खेळत होता. तर दुसरीकडे फकर जमान पाॅवर हिटींग सुरू केली. फासिफ अली आणि शोयब मलिक बाद झाल्यानंतर फकर जमानने चार गगनचुंबी षटकार खेचले. त्यामुळे 20 षटकात पाकिस्तानला 176 धावा करता आल्या.

पाकिस्तानने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. कर्णधार एराॅन फिंच लवकर बाद झाला. त्यानंतर पाॅवर हिटर मिचेल मार्शने मोर्चा सांभाळला. त्यांने पाॅवर प्लेमध्ये फटकेबाजी केली. त्यानंतर तो शाबाद खानच्या फिरकीत अडकला.

पाॅवर प्लेनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. डेव्हिड वाॅर्नरने काही खेळी फटकेबाजी केली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात डेव्हिड वाॅर्नर बाद झाला. त्यानंतर स्टिवन स्मिथ आणि माॅक्सवेल देखील बाद झाले.

अखेरच्या पाच षटकात ऑस्ट्रेलियाला 62 धावांची गरज होती. त्यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोनिसने फटकेबाजी सुरू केली. त्यानंतर दोघांनी अखेरपर्यंत झुंज देत ऑस्ट्रेलियाला फायनलचं तिकीट मिळवून दिलं आहे.

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये चांगली कामगिरी करून देशासाठी पहिला विश्वचषक जिंकण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.

फायनलचा सामना येत्या 14 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात आता दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध रणनिती आखण्याचा प्रयत्न करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण

“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”

“संजय राऊत बोलून बोलून दमतात, त्यांना बॉर्नविटा पिण्याची गरज”

“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय, पण भाजप कार्यकर्ते जाऊ देत नाहीत”