Top news कोरोना देश

मे महिन्यातील आकडेवारी सर्वात धक्कादायक; इतक्या लाख लोकांना झालाय कोरोना!

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा फटका सर्वात जास्त बसलेल्या देशांपैकीच भारत एक आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ICMR ने देशात राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण केलं होतं. या सेरो सर्वेक्षणाचे धक्कादायक निकाल आता समोर आले आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीला देशातील 0.73 टक्के प्रौढ म्हणजेच 64,68,388 लोक कोरोना विषाणूच्या धोक्यात होते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जेव्हा देशभर लॉकडाऊन होतं तेव्हा प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटीव्ह रुग्ण होता. त्यावेळी 82 ते 130 संक्रमणाची प्रकरण समोर होती, अशी माहिती ICMR ने दिली आहे.

ICMR च्या रिपोर्टनुसार ग्रामीण भागात सेरो पॉझिटीव्हचं प्रमाण सर्वाधिक होतं. ग्रामीण भागातील 69.4 टक्के लोक सेरो पॉझिटीव्ह आहेत. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये 15.9 टक्के आणि शहरी नसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये 14.6 टक्के सेरो पॉझिटिव्हचं प्रमाण नोंदवलं गेलं आहे.

तसेच 18 ते 45 वर्ष वयोगटातील 43.3 टक्के लोक म्हणजेच सर्वाधिक लोक सेरो पॉझिटीव्ह आहेत. 46 ते 60 वयोगटातील 39.5 टक्के सेरो पॉझिटीव्ह आहेत. तर 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील सर्वात कमी सेरो पॉझिटिव्ह आहेत.

देशातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांत हा सर्व्हे करण्यात आला होता. तर 70 जिल्ह्यातील 700 गावं व प्रभागांचा यामध्ये समावेश होता. 11 मे ते 4 जून या काळात हा सर्व्हे करण्यात आला होता. तसेच ज्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही किंवा कमी रुग्ण आढळले आहेत. त्या जिल्ह्यांमध्येही कोरोना पसरला असल्याचं सर्व्हेत समोर आलं आहे. तसेच या जिल्ह्यांत लॅब वाढवण्याची आवश्यकता असल्याचं ICMR ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

कोरोनाबधितांपैकी 18.7 टक्के लोक कोरोनाचा जास्त धोका असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात काम करत होते, असंही सर्व्हेत समोर आलं आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. मात्र, अद्याप या महामारीवर लस तयार होऊ शकली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

अबब! BMCनं पाडलेलं कंगणाचं ऑफिस इतक्या कोटींचं; संपूर्ण संपत्तीची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!

आरोप सिद्ध झाल्यास अभिनेत्री रिया चक्रवर्तीला होऊ शकते ‘ही’ शिक्षा!

सुशांतसिंग राजपूतच्या मृ.त्यूबाबत ‘या’ वकिलानं केला अत्यंत धक्कादायक खुलासा

“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, किती लोकांची तोंड तुम्ही बंद करणार आहात?”

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! भायखळा तुरुंगात रियाची रवानगी होणार