“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल

मुंबई | गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर उत्तर सभा सुरु झाली असून अवघ्या राज्याचं लक्ष फडणवीसांकडे लागलं आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक सभेनंतर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीसांची उत्तर सभा पार पडत आहे.

भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आलं. आजच्या संमेलनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले.

सभा सुरु होताच फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्याची कालची सभा मास्टर सभा असून लाफ्टर सभा असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

वाघाचे फोटो काढल्यामुळे वाघ होत नाही, असा खोचक टोलाही फडवीसांनी शिवसेेनेवर केला आहे. या देशात एकच वाघ असून त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे, असंही फडणवीस म्हणाले.

अयोध्याच्या आंदोलनात तुमचा एकही नेता नव्हता, हे म्हटल्यावर किती मिरची लागली, असं गाण्यातून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”

  Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

  राज ठाकरेंबाबत भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

  मोठी बातमी! भारतीय बॅडमिंटन संघानं तब्बल 73 वर्षानंतर रचला इतिहास

  “कुणाच्याही वडिलांबद्दल त्यानं मरावं असं कोणी बोलतं का?”; सुप्रिया सुळे संतापल्या