उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | राज्यात आणि देशभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे त्यातच आता भारतीय हवामान विभागाने उष्णतेमध्ये तीव्र वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भात बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा 44 अंशांच्या आसपास आहे. याच विभागात 8, 9 मे रोजी तुरळक भागात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

दरम्यान, देशात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईमुळे अनेक ठिकाणी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेचा अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  “मी भाजपसोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही”

  कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यानं खळबळ

  “राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही”

  “राज ठाकरेंना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास सुरू झाला”