मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय; अजित पवारांचा टोला

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. गेल्या काही वर्षांमध्ये मंत्रालयात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मंत्रालयातल्या वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या होत्या. त्यानंतर तिथे जाळ्या बसविण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती आरोप केलाय.

मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय. त्यामुळेच तिथे जाळ्या बसवाव्या लागल्या आहेत. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. महाराष्ट्रातल्या अडचणीवर मुख्यमंत्री काही बोलत नाही, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

कोरेगाव भिमाच्या दंगली मागचा मास्टरमांइड का सापडत नाही? असा सवालही अजित पवारांनी केला आहे. आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी कर्जमाफी दिली नाही तर पवारांची औलाद नाही असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपची मंडळी थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आलेत. पण कोणतंही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. गड किल्यात आता झमझम सुरू करणार आहेत. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केलेत, असा आरोपही अजित पवारांनी केला.

महत्वाच्या बातम्या-