मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, रेल्वे (Railway) मंत्रालयानेही आपल्या सर्व झोनमध्ये भत्ता देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रभावी सुधारित दरांसह महागाई भत्ता दिला जाईल. रेल्वेच्या (Railway) या निर्णयाचा थेट फायदा सुमारे 14 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. ते या महिन्याच्या अखेरीस दिले जाईल.

रेल्वे बोर्डाचे उपसंचालक जय कुमार यांच्या वतीने मंगळवारी या संदर्भात सर्व झोन आणि उत्पादन युनिट्सना पत्र जारी करण्यात आलेत.

या पत्रात असं म्हटलं आहे की रेल्वे कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता 1 जानेवारी 2022 पासून मूळ वेतनाच्या सध्याच्या 31% वरून 34% पर्यंत वाढवला जाईल.

या पत्रात पुढं म्हटलं आहे की, सरकारने स्वीकारलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सुधारित वेतन रचनेतील मूळ वेतन या शब्दाचा अर्थ वेतन मॅट्रिक्समधील विहित स्तरावर काढलेला वेतन असा होतो.

यात विशेष वेतन इत्यादी इतर कोणत्याही प्रकारच्या पगाराचा समावेश नाही. महागाई भत्ता हा मोबदल्याचा विशिष्ट घटक राहील.

रेल्वे बोर्डाच्या उपसंचालकांनी पत्रात म्हटलं आहे की, मार्च 2022 च्या वेतन वितरणाच्या तारखेपूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज 

मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वगतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला 

आरबीआयचा ‘या’ 3 बँकांना झटका; केली मोठी कारवाई 

कोरोनाचं नवं गंभीर लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!