‘विराट मैदानात जितका आक्रमक आहे तितकाच तो…’; अनुष्काने सांगितलं ‘ते’ सिक्रेट

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावरील आपल्या आक्रमकतेमुळे नेहमी चर्चेत असतो. विराटने आजवर आपल्या उत्तम खेळीमुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मैदानावरील विरुची आक्रमकता अनेकांना आवडते. मात्र, विराट मैदानात जितका आक्रमक आहे तितकाच तो मैदानबाहेर शांत असल्याचा खुलासा विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने केला आहे.

विराटआणि अनुष्काची जोडी नेहमीच चर्चेत असते. हे सुपर कूल कपल अनेकांच्या आवडीचं आहे. विराट आपल्या आयुष्यात आणि स्वभावात झालेल्या बदलाचे श्रेय नेहमीच अनुष्काला देतो. अनेकदा माध्यमांमध्ये त्याने ही गोष्ट बोलून देखील दाखवली आहे.

तसेच अनुष्का देखील माध्यमांंमध्ये विराट विषयी बोलताना दिसते. काही दिवसांपुर्वी अनुष्काने एका कार्यक्रमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी अनुष्काने आपल्या पतीविषयी अनेक बाबी उघडपणे सांगितल्या होत्या.

यावेळी बोलताना अनुष्का म्हणाली होती की, विराट मैदानावर जितका आक्रमक आहे, तितकाच तो मैदानाबाहेर शांत आहे. आपण हे माझ्या मित्रांना आणि टीमला विचारू शकता. मी अनकेदा विराटला म्हणते, यु आर सो चिल.

दरम्यान, विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूट दरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना जवळजवळ 4 वर्ष डेट केलं होतं. त्यांनी आधी जाहीरपणे आपल्या नात्याची कबूली दिली नव्हती. मात्र, नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मग चाहत्यांना या नात्याविषयी सांगितलं.

अनुष्का आणि विराटने इटलीमध्ये गुपचूपपणे पण मोठ्या धामधुमीत आपला विवाहसोहळा उरकून घेतला. दोघांनीही आपल्या विवाहाचे फोटो सोशल मिडीयावरून शेअर केले होते. त्यावेळी दोघांसाठी वेडे असलेल्या अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता.

कोहलीने इटलीमध्ये अनुष्का शर्मासोबत 21 डिसेंबर 2017 ला सात फेरे घेतले होते. या विवाह सोहळ्याला काही जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. नुकतीच या दोघांना एक मुलगी देखील झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् जुळता जुळता तुटलं; ‘तो हा नव्हेच’ म्हणत नवरीने लग्नमंडपातच मोडलं लग्न!

…अन् अशाप्रकारे गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे दर

पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट! ‘या’ कारणाने भाजप नगरसेवकाला पुणे पोलिसांची नोटीस

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतच्या आठवणीत व्याकूळ, व्हिडिओ शेअर करत म्हणाले…