महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल!

मुंबई | अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले भाव आज स्थिर असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. 22 मार्चपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14 वेळा वाढ केली आहे.

या काळात दोन्ही प्रकारचे इंधन सुमारे 10 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी, 4 नोव्हेंबर 2021 नंतर, कंपन्यांनी सुमारे चार महिने त्यांच्या किमती वाढवल्या नाहीत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेली आणि आता या दबावाची भरपाई करण्यासाठी कंपन्या सातत्याने किंमती वाढवत आहेत.

गुरुवारी कोणतीही वाढ न झाल्याने राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 105.41 रुपयांवर स्थिर आहेत. मात्र, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर झाला आहे.

सध्या देशात विकलं जाणारं हे सर्वात महाग पेट्रोल आहे.पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज ठाकरेंना धक्का?, हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर? 

“…तर 2 लाख रूपये भरपाई मिळणार”, नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स

हनीमूनच्या रात्री असं काय झालं?, बायको रागानं लालबुंद झाली अन्…

“राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये”