मुंबई | पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर (Ravi Vhatkar) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. व्हटकर यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे (ED) नोंदवलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे. त्यामुळे परब आणि देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) आणि ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) बंगल्यावर गुप्त बैठका व्हायचा, असं रवी व्हटकर यांनी म्हटलंय.
पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापूरते आहे. पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जात होता. राज्यातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या व नियुक्त्यांपूर्वी देशमुख आणि परब यांच्यात सह्याद्री अतिथी गृह व ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त बैठक व्हायची. या बैठकीला माझ्यासह देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे हेसूद्धा उपस्थित असल्याचं व्हटकर यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील मंत्री, आमदार आणि पक्षांचे नेते हे देशमुख यांच्याकडे त्यांच्याकडील काही पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची नावे पाठवत होते. यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून आलेल्या याद्या माझ्याकडे यायच्या. तर शिवसेनेकडील याद्या परब आणून द्यायचे. आपल्याकडे पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकार्यांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी होती. तर, पालांडे याच्यावर सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधिक्षक पदापासून उच्चपदस्थ अधिकार्यांच्या याद्यांची जबाबदारी होती, अशी माहिती व्हटकर यांनी आपल्या जबाबात दिली आहे.
या बैठकीत चर्चा होऊन पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांच्या याद्या तयार केल्या जात होत्या. पूढे या फायनल याद्या पोलीस अस्थापना मंडळाकडे पाठविल्या जात होत्या. पोलीस अस्थापना मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन बदल्या, नियुक्त्यांची ऑर्डर निघायची, असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी देशमुखांवर केलेल्या पोलिसांना 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याच्या गंभीर आरोपांसह भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या आरोपांवरुन गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे.
देशमुख यांच्या गृहमंत्री असल्याच्या काळात झालेल्या पोलीस बदल्यांबाबत ईडीने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांसह गृहमंत्रालयातील अधिकार्यांचे जबाब नोंदवले आहेत. यात देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी ईडीकडे नोंदवलेल्या जबाबाचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा- अमृता फडणवीस
टीम इंडियाचा नवा Test Captain कोण?, सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं
“मला फक्त मुंबईत येऊ द्या, मग मी बघतो काय करायचं ते”
“देशात पाॅर्न इंडस्ट्री बनू नये, तुम्ही मला बोल्ड म्हणत असाल तर…”
शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो…’हे’ काम करा नाहीतर डीमॅट अकाऊंट बंद होईल