मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

औरंगाबाद | स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हटलं जातं. आईला जगातील सर्वात जास्त संयमी आणि सहनशील व्यक्ती मानलं जातं. माणसाच्या आयुष्याला आकार देण्यात आईचा मोठा हात असतो.

मुलं कितीही मोेठी झाली तरी ती आपल्या आईसाठी बाळ असतात. आई अगदी शेवटपर्यंत तिच्या लेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असते. त्यागाचं आणि कर्तव्याचं सर्वोच्च प्रतिक आई असते.

आईची तिच्या मुलांवर किती माया असते हे एका आईनं पुन्हा सिद्ध केलं आहे. विवाहित मुलीला आजारपणात मदत करण्यासाठी आईनं आपल्या किडनीचा देखील त्याग केला आहे.

67 वर्षीय आईनं आपल्या 40 वर्षीय विवाहित मुलीला जीवनदान देण्यासाठी स्वत:ची किडनी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

सिल्लोड तालूक्यातील पांगरी येथील रहिवासी छाया अशोक झरवाल या तीन वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त होत्या. त्यांनी अनेकजागी दवाखान्यात इलाज केला होता.

दोन्ही किडन्या खराब झाल्यानं छाया यांना सध्या डायलिसीस प्रक्रियेवर ठेवण्यात आलं होतं. पण डायलिसीसवर छाया यांना वाचवणं जास्त दिवस शक्य नव्हतं. परिणामी अनेक समस्या उभ्या राहात होत्या.

आपल्या लेकीला वाचवण्यासाठी आता कोणताच पर्याय नाही हे पाहून स्वत:ची किडनी देेण्याचा निर्णय छाया यांच्या आईन रूखमनबाई माहोर यांनी घेतला. आणि त्यांनी आपल्या जिवाची परवा न करता किडनी दिली.

औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात छाया यांच्यावर ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. रूखमनबाई यांचं सध्या सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

दरम्यान, आयुष्यातील कसल्याही कठीण प्रसंगात मुलांना वाचवण्यासाठी आई प्रयत्न करत राहाणारी एक निस्वार्थी व्यक्ती म्हणजे आई असते, हे पुन्हा रूखमनबाईंच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”