पुणे | देशात सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे.
अशातच पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील बिबवेवाडीत जावयाने राहत्या घरी आपल्या सासूची गळा दाबू हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलिसांनी जाऊन तपास केला असता, संबंधित जावई आपल्या सासूला घेऊन कर्नाटकावरून पुण्याला पळून आला असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आल्यानंतर त्या दोघांमध्ये कोणत्याना-कोणत्या कारणावरून सतत वाद होत होते. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून जावयाने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित मृत सासूचे नाव अनारकली महमद तेरणे असून, ती 45 वर्षाची होती. ती मुळची बेळगावची रहिवाशी आहे. तर संबंधित आरोपीचे म्हणजेच जावयाचे असिफ आतार असं आहे. काही दिवसांपूर्वी अनारकलीच्या मुलीचे असिफबरोबर विवाह झाला होता.
सुरूवातीचे काही दिवस असिफ आणि त्याची पत्नी यांच्यात चांगले आनंदाचे गेले. त्यानंतर असिफ आणि त्याची सासू अनारकली या दोघांच्या भेटी-गाठी वाढू लागल्या. यादरम्यान त्यांच्यामधील जवळीक आणखीनच वाढू लागली. त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंध सुरू झाले.
याचमुळे ते दोघं काही दिवसांनंतर कर्नाटकमधून पळून पुण्याला आले. इकडे आल्यावर असिफ मजुरीचे काम करत होता. यातूनच त्यांचा उदर्निवाह होत होता. परंतू त्यांच्यात सारखेच छोट्या-छोट्या कारणावरून भांडणं होत होती. अखेर असिफने आपल्या सासूला कायमचं संपवून टाकलं.
हत्या केल्यानंतर असिफने आपल्या घराला कुलूप लावलं आणि तिथून पळून गेला. मात्र त्याने सासूची हत्या केली असल्याची माहिती त्याच्या एका मित्राला दिली होती. त्यानंतर त्या मित्राने बिबवेवाडी पोलिसांना जाऊन सांगितली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने यावर अॅक्शन घेतली.
बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणी संबंधित जावईयावर हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी जावयाला अटक देखील केलं आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
वाह! ‘वदनी कवल घेता…..’ म्हटल्याशिवाय…
IPL 2021: के. एल. राहूलऐवजी ‘हा’ खेळाडू झाला…
IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, कर्णधार के एल राहून…