मुंबई | आपल्या विनोद शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर कपिल शर्मा. कपिल नेहमीच त्याच्या विनोदी शैलीनं चाहत्यांचं मन जिंकून घेत असतो.
कपिलचा काॅमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ याचेही लाखो चाहते आहेत. फक्त भारतातच नाही तर परदेशातही कपिलनं त्याची छाप सोडली आहे.
भारताचा कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. कपिलला हे यश सहज मिळालेलं नाही. यासाठी कपिलनं खूप मेहनत घेतली आहे. कपिल शर्माने आजवर मिळवलेलं स्थान भारताच्या विनोदी कलाकारांच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे.
कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कपिल शर्माचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा निर्माता महावीर जैन यांनी केली आहे. कपिलवर चित्रपट येणार म्हटल्यावर त्याचे चाहते सध्या खूप आनंदी असल्याचं पहायला मिळत आहे.
कपील शर्माच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे नाव फनकार असल्याचं समोर येत आहे. फंकार हा एक उर्दू शब्द आहे. याचा अर्थ होतो कलाकार, आर्टिस्ट. या चित्रपटात कपिल शर्माच्या आयुष्यातील अनेक माहित नसलेल्या गोष्टींवरही प्रकाशझोत टाकला जाईल.
कपिल शर्माच्या जीवनाचा उलगडा करणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा खूप दिवसांपासून रंगल्या होत्या.
आता कपिल शर्माचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय चाहत्यांना तर आत्ताच चित्रपटाची आतुरता लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
त्वचेवर ‘अशी’ लक्षणं दिसल्यास करु नका दुर्लक्ष, असू शकतो Omicron?
संतापजनक! पुन्हा सुरु झालेल्या एसटीवर दगडफेक, प्रवासी थोडक्यात बचावले
राज्यात ओमिक्राॅनची तिसरी लाट येणार?; रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; सरकारकडून मिळणार खास गिफ्ट
IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी ‘या’ 3 खेळाडूंना मिळू शकते लखनऊमध्ये डायरेक्ट एन्ट्री