बीड | जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे कित्येक लोकांनी आपला जीव गमावला. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे 50 हजार रूपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
राज्य शासन स्तरावर झालेल्या या निर्णयानंतर प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे. सरकारने मदत देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या यादीत चक्क जिंवत व्यक्तींची नावं आढळल्याने खळबळ उडाली आहे.
हा धक्कादायक प्रकार घडला आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत. अंबाजोगाईत मृत व्यक्तींच्या यादीत जिंवत व्यक्तींची नावं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 316 जणांची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. 316 जणांच्या याच यादीत आता 532 नावे आली आहेत. धक्कादायक म्हणजे या यादीत अंबाजोगाईतील जिवंत व्यक्तींच्या नावाचाही समावेश आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर महसूल आणि स्थानिक प्रशासन कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींंची यादी तयार करत आहेत. नगरपरिषदेच्या वतीने सध्या या यादीची पडताळणी सुरू आहे.
या यादीची पडताळणी करत असताना या यादीतून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अंबाजोगाई तालुक्यातील जिवंत असलेल्या व्यक्तींचाही त्या यादीत मृत म्हणुन समावेश आहे.
नगरपरिषदेचे कर्मचारी खातरजमा करण्यासाठी यादीत नावे असलेल्या काही व्यक्तींच्या घरी गेले. त्यावेळी मयत म्हणुन यादीत नोंद असलेल्या व्यक्तींना समोर जिवंत बघून कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
अंबाजोगाईत कोरोनामुळे 316 जणांचा मृत्यू झाला. मात्र यादीत 532 जणांचा समावेश आहे, त्यामुळे यादीत ही उर्वरीत 216 नावे आली कुठून याचा शोध प्रशासकीय यंत्रणेकडून घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ‘या’ सरकारने केली कर्जमाफीची घोषणा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”
‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल
1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज
फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…