नवी दिल्ली | क्रिकेट (Cricket) हा सध्या जगभर प्रचंड लोकप्रिय खेळ मानला जातो. अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. परिणामी जगात क्रिकेटला एक वेगळं वलय आहे.
क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आपल्या कामगिरीनं जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतात. परिणामी जगभरात खेळाडूंना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असते.
क्रिकेट एक लोकप्रिय खेळ असण्यासोबतच एक श्रीमंत खेळ म्हणून देखील सध्या जगभर प्रसिद्ध आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी सोबतच पैसाही भरपूर मिळतो.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओळखण्यात येतं. आयपीएलमध्ये तर प्रचंड प्रसिद्धी आहे. परिणामी अनेक प्रकारचे गैरव्यवहार देखील आढळून आले आहेत.
जेव्हा गैरव्यवहारांची गोष्ट चर्चेत येते तेव्हा जगातील दिग्गज खेळाडूंची चर्चा व्हायला लागते ज्यांच्यावर खेळाच्या मैदानानंतर बाहेर जीवन जगत असताना देखील अनेक आरोप झाले आहेत.
आपल्या फिरकीच्या तालावर अनेक फलंदाजांना नाचवणारा ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वाॅर्न हा क्रिकेटच्या मैदानावर जितका लोकप्रिय होता तितकाच मैदानाबाहेर त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळं चर्चेत होता.
शेन वाॅर्नवर 2002 मध्ये ब्रिटीश नर्सनं बळजबरी केल्याचा आरोप लगावला होता. इतकंच नाही तर अनेक महिलांनी त्याच्यावर सेक्स केल्याचा आरोप केला होता. परिणामी वाॅर्नला संघ व्यवस्थापनानं उपकर्णधार पदावरून काढलं होतं.
धोकादायक फलंदाज ख्रिस गेलच्या रूममध्ये तीन मुली आपत्तीजनक अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्या मुलींना पोलीस कारवाईत पकडण्यात आलं होतं. प्रसिद्ध खेळाडू डैरेल टफीचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत टफी आणि एक महिला सेक्सच्या स्थितीत आढळले होते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रीदीला कराचीत एका हाॅटेलमध्ये अन्य दोन सहकाऱ्यांंसमवेत महिलांसोबत पाहिलं गेलं होतं. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांच्यावर कारवाई केली होती.
धडाकेबाज क्रिकेटपटू केविन पीटरसनवर सेक्स अॅडिक्ट असल्याचा आरोप केला गेला होता. दक्षिण आफ्रिकेची माॅडेल वेनेसा निम्मोनं पीटरसनवर आरोप लगावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे