राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गळती; ‘या’ बड्या नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश

मालवण | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. मात्र, आता भाजपनेच राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळीक मानले जाणारे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुलाबराव चव्हाण यांनी मालवण येथील नीलरत्न बंगल्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप खासदार नारायण राणे हे देखील यावेळी उपस्थित होते. भाजप नेत्यांनी गुलाबराव चव्हाण यांना शुभेच्छा देत त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहेत. जिल्हा बँकांच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गुलाबराव चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले काही नेते पुन्हा राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत, असं म्हटलं होतं. मात्र गुलाबराव यांच्या पक्षांतर करण्याने राष्ट्रवादीलाच धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘तहसीलदार महिलेच्या पतीकडून माझ्या जिवाला धोका आहे’; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जगातील एकमेव देश, जिथे गेल्या 100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!

शिक्षकानं मुलीला शिकवणीसाठी बोलवलं, अन् केला अत्यंत धक्कादायक प्रकार

छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा जागेवर बसवा, अन्यथा… आक्रमक शिवप्रेमींचा इशारा

माणूस म्हणावं की हैवान?; नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं अन्…