कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं उडवली सरकारची झोप; महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटनं सर्वांची झोप उडवली आहे.

केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे.

राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेलं आहे अशाच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. असं असलं तरी राजकीय सभांना आणि जाहीर कार्यक्रमांना मात्र परवानगी देण्यात आली आहे.

ज्या व्यक्तींना कोरोनाचे नियम पाळले नाहीत, अशा लोकांकडून घेण्यात आलेला दंड देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मास्क घातला नसेल तर त्या व्यक्तीला 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये जर कोणी मास्क घातलेला नसेल तर प्रवाशा आणि चालकाकडून दंड आकारण्यात येणारे.

मुंबईतील एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी आहे.

केरळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील रुग्णवाढ भविष्यात महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवणार का? हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा विचार महापालिका करत आहे, अशी माहिती समोर आलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची राज्यात दहशत; मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय 

कोरोनानं मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा! 

राकेश झुनझुनवालांना मोठा धक्का; एका आठवड्यात झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान 

“अजूनही भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होऊ शकतं”