मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाळ्याचा तडाखा बसल्याचं पहायला मिळत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने आता नागरिक देखील त्रस्त झाले आहेत.
अशातच आता अवकाळी पावसामुळे शेती, फळबागा आणि इतर धान्य गोदामांचं नुकसान झालं आहे. सध्या एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या झळा बसताना दिसत आहेत. त्यामुळे आता मे मध्ये उन्हाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
अशातच आता पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 5 आणि 6 तारखेला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुढील 4 ते 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेची आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. उष्मघातानं राज्यातील तीन लोकांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेविषयी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर चंद्रकांतदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करू – संजय राऊत
सिगारेट पिणाऱ्यांनो… वेळीच व्हा सावध, नाहीतर डोळेही गमावून बसाल
“मनसे बिनबुडाची, त्यांना बुड नाही अन् शेंडाही नाही”
प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी; बाहेर आल्यावर म्हणाले “मला भंडावून…”
“मी टाईमपास टोळी म्हणायचो पण आता…”, आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर बरसले